माणसाने आधी चांगला माणूस बनले पाहिजे – प्रा. नरेंद्र बनसोडे

माणसाने आधी चांगला माणूस बनले पाहिजे - प्रा. नरेंद्र बनसोडे
  • काँग्रेसचे प्रा. नरेंद्र बनसोडे यांचे रॉयल फाउंडेशनच्या विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरात प्रतिपादन

पिंपरी : जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचण्याच्या आधी माणूसाने चांगला माणूस बनणे गरजेचे असून भारताचा सुजाण नागरिक बनले पाहिजे. तसेच आपल्या आई-वडिलांच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र बनसोडे यांनी काळेवाडी येथे केले.

रॉयल फाउंडेशन व पदमने क्लासेस यांच्या वतीने काळेवाडीतील ज्ञानेश्वर कॉलनी येथे नुकतेच दहावी व बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व मार्गदर्शन शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा शैलीत उदाहरणांमधून जीवनाच्या विशिष्ट टप्प्यावर घेवयाच्या निर्णयाबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.

माणसाने आधी चांगला माणूस बनले पाहिजे - प्रा. नरेंद्र बनसोडे

त्याप्रसंगी रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रवि रमेश नांगरे, उपाध्यक्ष आनंद काटे, सचिव प्रकाश नांगरे, सल्लागार मुजावर, सल्लागार रामकृष्ण पदमने, संकल्प महिला बचत गटाच्या अध्यक्षा राधा काटे, समृद्धी बचत गटाच्या अध्यक्षा आशा नांगरे, सल्लागार सुवर्णा सोनवलकर, खजिनदार गणेश नांगरे, सदस्य विकी साळवे, कार्याध्यक्षा तुलसी नांगरे, सल्लागार महेंद्र सोनवले, सदस्य पंकज पाटोळे, शितल पाटोळे, सल्लागार अशोक गायकवाड तसेच पदमने क्लासेसचे सर्व टीचर व पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी व पालकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रवि नांगरे म्हणाले की, दहावी हा जीवनाचा प्रथम पाया असून आपले वय वाढते तशी आपली बुद्धी वाढली पाहिजे. काळाप्रमाणे आपण सर्व माहिती आत्मसात करून आपल्या जीवनात यशस्वी झाले पाहिजे. जीवनात यश संपादन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नसून तेथे स्वतःला पुर्णपणे झोकून देऊन मेहनत करणे गरजेचे आहे. दहावी व बारावीच्या परिक्षेत ८०, ९० टक्के मिळवले तरच त्यांचा सत्कार, सन्मान केला जातो. मात्र, रॉयल फाउंडेशनने या संकल्पनेला फाटा देऊन उत्तीर्ण सर्वच विद्यार्थ्यांचा सन्मान करत, त्यांना पुढील स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.