न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा फुले यांना अभिवादन

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा फुले यांना अभिवादन

रहाटणी (लोकमराठी) : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, तात्या शिनगारे, युवराज प्रगणे, राजेश गायकवाड, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

महात्मा फुले यांनी सर्व समाजाच्या मुलींसाठी १८४८ साली पहिली शाळा काढली व त्यानंतर १८५१ साली अनुसूचित जातीच्या मुलांसाठी शाळा काढली. मुलींना शिकविण्यासाठी शिक्षिका मिळत नसत त्याकरीता त्यांनी सावित्रीमाई फुले यांना शिक्षण दिले व पहिली शिक्षिका बनविले. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी आणि संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका प्राची खाडे यांनी केले व चारुशीला फुलपगार यांनी आभार मानले.