पुणे महापालिकेत लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र

पुणे महापालिकेत लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र

पुणे : नगरसेविका स्वाती अशोक लोखंडे यांनी पुणे महानगरपालिकेत आद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे यांचे तैलचित्र लावण्यात यावे, असा ठराव जाने २०१९ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिला होता. मात्र, कोरोना महामारीमुळे महापालिकेची सर्वसाधारण सभा लांबली गेली. शेवटी हा ठराव ऑगस्ट २०२१ मध्ये मंजूर झाला. त्यानूसार सोमवारी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र सोपवण्यात आले.

क्रांतिगुरु लहुजी साळवे स्मारक समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अशोक लोखंडे, ट्रस्टचे सचिव विकास सातारकर, मातंग समाजाचे नेते शंकर तडाखे, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव संजय केंदळे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर नेटके, दिपक वायाळ, अनिकेत लोखंडे, प्रदिप वैराट, रवि अडागळे, संतोष माने, उमेश शिंदे, हर्षद शिंदे, राहुल चव्हाण आणि मामा केंदळे आदी उपस्थित होते. अशी माहिती भास्कर नेटके यांनी दिली.