समाजभूषण अप्पासाहेब जेधे यांच्या दूरदृष्टीमुळे बहुजनांना शिक्षणाची दारे उघडली – प्रा. जयप्रकाश जगताप

समाजभूषण अप्पासाहेब जेधे यांच्या दूरदृष्टीमुळे बहुजनांना शिक्षणाची दारे उघडली - प्रा. जयप्रकाश जगताप

पुणे : जेधे मॅन्शन हे केवळ जेधे कुटुंबाच्या वास्तवाचे किंवा राहण्याची ठिकाण नसून, ते सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीचे केंद्रस्थान होते. अप्पासाहेबांची शैक्षणिक व सामाजिक दृष्टी महत्त्वपुर्ण ठरली. त्यांच्या काही निर्णयांमुळे बहुजनांच्या मुलांना आज शिक्षणाची दारे खुली झालेली पाहायला मिळतात. त्यांची तत्कालीन दूरदृष्टी आज घडीला बहुजनांच्या शिक्षणासाठी सर्वार्थानं महत्त्वपूर्ण ठरताना दिसते. असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. जयप्रकाश जगताप यांनी केले.

श्री शिवाजी मराठा सोसायटीचे समाजभूषण बाबुराव उर्फ अप्पासाहेब जेधे महाविद्यालयांमध्ये अप्पासाहेब जेधे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. लेखक, प्रकाशक, कला शिक्षक व नियामक मंडळ तसेच श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सदस्य असलेले प्रा. जयप्रकाश जगताप यांनी अप्पासाहेब जेधे यांच्या जीवन कार्यावर यावेळी प्रकाश टाकला.

त्याप्रसंगी डॉ. धनाजी भिसे यांनीही मनोगत व्यक्त केले. या अभिवादन सभेला श्री शिवाजी मराठा सोसायटीचे खजिनदार जगदीश जेधे, सदस्य गजानन जेधे, संताजी जेधे, अप्पासाहेब जेधे यांचे चिरंजीव राजाराम जेधे, अप्पासाहेब जेधे यांच्या सूनबाई राजश्री जेधे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमित गोगावले यांनी केले व आभार प्रा. हर्षल चलवादी यांनी मानले.