वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका साजरे करतेय माझी वसुंधरा अभियान – प्रशांत राऊळ

वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका साजरे करतेय माझी वसुंधरा अभियान - प्रशांत राऊळ

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी : वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका माझी वसुंधरा अभियान साजरे करत आहे. अशी टिका पर्यावरण मित्र प्रशांत राऊळ यांनी केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी महापालिका असंवेदनशील असून शहरात बेसुमार झाडांची कत्तल सुरू आहे. महापालिकेनेच पवना नदीत मैला मिश्रित पाणी सोडून तीला गटार करून टाकले आहे. शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला असून पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर शहराला फक्त शिकलेलाच आयुक्त गरजेचा नसून एक जागृत, सक्रिय आणि संवेदनशील आयुक्त असणे गरजेचा आहे. असेही राऊळ यांनी म्हटले आहे.

राऊळ यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाची खिल्ली उडवताना खालील मुद्दे मांडले आहेत.

पंचतत्वे

जल –

१. पालिका हद्दीत नदीमध्ये मैला मिश्रित पाणी सोडणे

२. पालिका व इतर अपुरे STP प्रकल्प

३. नदी प्रदूषण करणाऱ्या लोकांवर कारवाही न करता एक प्रकारचे संरक्षण

४. नदी स्वचतेच्या नावाने पैशाची उधळपट्टी

५. पालिका क्षेत्रात गळक्या पाईपलाईन मधून रोज वाया जाणारे पिण्यायोग्य पाणी

६. शहरातील अवैध वॉशिंग सेन्टरचा सुळसुळाट व पालिकेची बघ्याची भूमिका त्यामुळे भुजल धोक्यात

७. शहरातील ओढ्यानाल्यात मैला मिश्रित पाणी सोडले जाते

८. जल स्रोत धोक्यात सर्व ओढ्या नाल्यावर अतिक्रमण

९. शहरातील विहीरी टँकर माफियांच्या हवाली

१०. जलसंधारण व त्याचे महत्व यावर दुर्लक्ष

११. पाणी जीरावण्याकडे दुर्लक्ष

१२. रेन वॉटर हार्वेस्टिंग कडे दुर्लक्ष

१३. सणांच्यावेळी होणारे जलप्रदूषण, मूर्ती विसर्जन बंद करून सर्व मूर्त्या तलावात विसर्जन करून तलावाची वाट लावली

१४. पाण्याचा पुनः वापर कडे दुर्लक्ष

वायू –

१. शहरात सर्वत्र जाळला जाणारा कचरा याकडे पालिकेचे संपूर्ण दुर्लक्ष

२. औद्योगिक घातक कचरा रोज मोठ्या प्रमाणात जाळला जातो त्याकडे पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष. तक्रार करूनही गुन्हेगारांना संरक्षण

३. शहरातील प्रदूषण करणाऱ्या कारखान्यावर कोणतीही कारवाही नाही.

४. अवैध वृक्षतोडी करणाऱ्या (पुष्पा) गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पालिका कर्मचाऱ्यांना व ठेकेदारांना पालिका आयुक्त व पोलीस आयुक्तांनाचे विशेष सहकार्य व संरक्षण

५. वृक्ष संवर्धन व जतन याकडे आयुक्तांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

६. झाडांचे दिखाव्यासाठी रंगरंगोटी करून नुकसान

७. शहरातील हवेच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी शून्य प्रयत्न

८. फटाके बंदी नाही

९. पालिकेच्या प्रत्येक कार्यक्रमात दिवसभर डिझेल generator लावून वायु प्रदूषण

१०. बांधकाम मधील कचरा व्यवस्थापन शून्य नियोजन सर्वत्र फेकला जातो

११. सायकल ट्रॅक नाहीत किंवा फक्त दिखाव्यासाठी सायकल रॅली

१२. इ वाहन चार्जिंग साठी कोळश्यावर तयार झालेली वीज वापरून जास्त प्रमाणात प्रदूषण.

भूमी –

१. कचरा व्यवस्थापन कडे पूर्ण दुर्लक्ष सर्वत्र घाणीचे साम्राज्य

२. बंदी असलेल्या प्लास्टिकचा शहरात सर्वत्र वापर व पालिकेची डोळेझाक

३. मोठ्या प्रमाणात कचरा उत्पन्न करणाऱ्या गृहनिर्माण यांच्या वर २०१६च्या केंद्र शासनाच्या कायद्यानुसार कारवाही न करता कचरा व्यवस्थापनाकडे पूर्ण दुर्लक्ष.

४. शहरात फक्त दिखाव्यासाठी पोस्टरबाजी व रंगरंगोटी

५. डांबरी रस्ता, पेविंग ब्लॉक आणि काँक्रिटिकरण करून स्मार्ट होण्याच्या नादात मातीशी संपर्क तोडला जात आहे.

६. वृक्ष गणनेतील घोळ

अग्नी-

१. अपारंपरिक उर्जा वापरकडे दुर्लक्ष, शक्यतो सर्व पालिका वाहने ही डिझेल व पेट्रोल व चालणारी

२.पालिका कार्यक्रमात diesel genset चा वापर

३. solar energy साठी कोणतेही विशेष काम नाही

४. पालिकेच्या कोणत्याही इमारतीवर सोलर पॅनल नाहीत

५. पालिकेची इमारताच हरित नाही

६. शहरात उर्जा लेखापरीक्षण नाही

७. bio gas साठी कोणतीही तरतूद नाही

८. कचराडेपो ची मोठी समस्या

९ कंपोस्टिंग साठी ठेकेदाराला फायदा पोहचवणे

आकाश –

फक्त दिखाव्यासाठी

१. शपथ घेणे

२. जनजागृती साठी पैसे खर्च करून परिस्थिती मध्ये बदल नाही (प्लास्टिक मुक्ती व कचरा व्यवस्थापन)

३. नागरिकांच्या सूचना आणि तक्रारींकडे दुर्लक्ष

४. शहरात कोणतीही जागा ही पर्यावरण पूरक अशी झालेली नाही

५. आयुक्त स्वतः याबाबत संवेदनशील नसल्याने पालिका अधिकारी सुस्त आणि बेजबाबदार झालेत.

६. माझी वसुंधरा कार्यक्रमाचा फक्त पैसा खर्च करण्यासाठी वापर

७. कोणतेही मूल्यमापन व्यवस्था नाही

८. शहरातील जैवविविधता धोक्यात

९. ठराविक सामाजिक संस्थांना वेठीस धरून व आर्थिक फायद्यासाठी सहभाग.

१०. पर्यावरण संबधी RTI कडे जाणूनबुजून दूर्लक्ष करत नागरिकांना माहिती न देणे.

पिंपरी चिंचवड करांनो ही आपली पालिका त्यामुळे शहराला एक जागृत, सक्रिय आणि संवेदनशील आयुक्त असणे गरजेचे आहे ना की फक्त शिकलेले. विचार करा आणि जागे व्हा भूलथापांना बळी पडू नका, पर्यावरणातील हे बदल परत सुधारता घेणार नाहीत.