पिंपरी, पुणे ( दि.14 मार्च 2022) शहर आणि परिसरातील रस्ते व दळणवळण व्यवस्था उत्तम असेल तर उद्योग, व्यवसाय व रोजगार वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम करणार आहे असे प्रतिपादन आमदार महेश लांडगे यांनी केले.
रविवारी (दि. 13 मार्च) भोसरी बसस्थानकामध्ये मार्ग क्रमांक ३६४ भोसरी ते घोडेगांव (व्हाया मंचर, निघोटवाडी, लांडेवाडी) या पीएमपी बस मार्गाचा लोकार्पण सोहळा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितिन लांडगे, नगरसेवक नितीन काळजे, संतोष लोंढे, सागर गवळी, राजेंद्र लांडगे, नगरसेविका भिमाताई फुगे, सोनालीताई गव्हाणे, युवा नेते योगेशभाऊ लांडगे, पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे, वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे तसेच शांताराम वाघेरे, रमेश चव्हाण, काळुराम लांडगे, कुंदन काळे, रमेश गवळी, विलास पाडाळे, विजय आसादे व आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.
या मार्गाचे एकूण अंतर ६१ किलोमिटर व प्रवास भाडे एकामार्गाचे ६० रुपये आहे. दिवसभरात एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. या मार्गाचा उपयोग कामगार, विद्यार्थी, शेतकरी यांना होईल अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितिन लांडगे यांनी यावेळी दिली.