रहाटणीत रंगणार खेळ पैठणीचा | कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन

रहाटणीत रंगणार खेळ पैठणीचा | कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन

रहाटणी, ता ७ : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ३३ मध्ये कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानच्या वतीने क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा या धमाल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे शुक्रवारी (ता. ११ मार्च) सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

प्रभाग क्र. ३३ मधील खास महिलांच्या आग्रही मागणीमुळे कै. गबाजी थोपटे प्रतिष्ठानतर्फे क्षण आनंदाचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये गप्पा गोष्टी रंजक खेळ सोबत कॉमेडीचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. या खेळाच्या माध्यमातून महिलांना भरघोस बक्षिसे जिंकता येणार आहेत.

यामध्ये प्रथम क्रमांकासाठी फ्रिज व पैठणी दुसऱ्या क्रमांकासाठी वाशिंग मशीन व पैठणी तिसऱ्या क्रमांकासाठी कूलर व पैठणी चौथ्या क्रमांकसाठी ओव्हन व पाचव्या क्रमांकासाठी मिक्सर, त्याचप्रमाणे अनेक उत्तेजनार्थ बक्षिसे व प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

दैनंदिन कार्यक्रमातून थोडा विरंगुळा मिळावा महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना भरघोस बक्षिसे जिंका यावीत, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी प्रभाग क्रमांक ते ३३ मधील महिलांनी या कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन माजी