भावी पिढीसमोर पालकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श ठेवणे गरजेचे

भावी पिढीसमोर पालकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श ठेवणे गरजेचे

मनुष्य हा पृथ्वीतलावरील सर्वाधिक बुद्धिजीवी प्राणी आहे हे आपण जाणतोच. मनुष्याला विचार, तर्क आणि दृष्टिकोन असण्याची कला नैसर्गिकरित्या अवगत आहे परंतु अजूनही माणूस हा विविध अंधश्रदेच्या विळख्यात अडकलेला दिसून येतो.

आजही समाजात अंगात येणे, पिंडाला कावळा शिवणे, भूत पिशाच्च, करणी, वशीकरण, जादू टोना, काळी जादू अश्या अनेक घटकांना बळी पडण्याचे प्रमाण दिसून येते, अगदी सुशिक्षित समाजात देखील ह्या गोष्टी घडतात ही एक शोकांतिका आहे. जीवनात कुठल्याही गोष्टीवर नितांत डोळस श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा ही भीती पोटी ब्राम्हराक्षस असते हे समजून घ्यायला हवे. यामध्ये प्रत्येक घटक वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे आणि होणाऱ्या घटनांची कारणीमीमांसा करणे आणि योग्य ते उत्तर शोधणे म्हणजेच तिमिरातून तेजाकडे जाण्याचा प्रवास होय.

सकारात्मक विचार जीवनाचे अनेक पैलू उलगडून देतात आणि विवेकी बनवतात, सद्यस्थितीत आपल्या भारतीय समाजाच्या भावी पिढी समोर सर्वच पालकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकी विचार याचा आदर्श ठेवायला हवा कारण भविष्यातील समाजाची प्रगती ही त्यांच्याच हातात आहे.

भावी पिढीसमोर पालकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श ठेवणे गरजेचे
साधना सवाने, पिंपरी