पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
  • पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल
  • एनयुजेएम ची पत्रकाराला साथ!

नाशिक : नाशिक येथील दैनिक सकाळ च्या नाशिक आवृत्तीचे नवीन नाशिक म्हणजेच सिडको विभाग प्रतिनिधी प्रमोद दंडगव्हाळ यांना भाजपा नगरसेविकेचे पती कैलास आहिरे यांनी विरोधात बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल राग येऊन गंभीर स्वरूपाची इजा करण्याच्या व मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी भाजप नगरसेविकेचा पति कैलास आहिरे याच्या विरोधात नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायदा आणि भारतीय दंड विधान कलम सहिते अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना याप्रकरणी पोलीस आणि पत्रकार व्हाट्सअप ग्रुप वर माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी याबाबत माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते त्यानुसार आज संध्याकाळी अंबड पोलीस ठाण्यात पत्रकार प्रमोद दंड गव्हाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे

काय आहे प्रकरण
नाशिकच्या सकाळमध्ये नवीन नाशिक किंवा सिडको विभागात काम करणाऱ्या प्रमोद दंड गव्हाळ यांना माहिती मिळाली की करोना संकटकाळात नागरिकांना राज्य शासनाकडून रेशनवर सवलतीच्या दरात धान्य वाटप होत आहे याठिकाणी या धान्य दुकानावर या विभागातील भाजप नगरसेविकेचे पती आपली नगरसेविका पत्नी आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून जणू काही हे धान्य आपण व्यक्तिशः अथवा आपल्या व्यक्तिगत प्रयत्नातून नागरिकांना मिळवून देत आहोत असा आव आणून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि भावी काळात लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते.

करोना सारख्‍या जीवघेण्या संकट काळात अन्नधान्याच्या वाटपात देखील राजकीय लाभ उठविण्याचा राजकारण्यांचा प्रयत्न दंडगव्हाळ यांना खटकला तसेच अन्य काही नागरिकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया नुसार त्यांनी दैनिक सकाळच्या ऑनलाईन एडिशन मध्ये

आयजी च्या जीवावर बायजी उदार
अशा मथळ्याखाली छायाचित्रा सह बातमी प्रसिद्ध केली या बातमीमुळे नाराज झालेल्या नगरसेविका पती कैलास आहिरे यांनी या प्रकरणी थातुरमातुर खुलासा केला तो देखील सकाळ ने ऑन लाईन प्रसिद्ध केला परंतु कैलास आहिरे यांनी दंडगव्हाळ यांना सदर बातमी दैनिक सकाळ प्रिंट आवृत्ती मध्ये प्रसिद्ध न करण्या बद्दल सांगितले तसेच भाजप शहराध्यक्ष यांनाही फोन करण्याची ची धमकीवजा सूचना दिली दरम्यान दंडगव्हाळ यांनी दैनिक सकाळ मध्ये सदर बातमी प्रसिद्ध होऊ नये म्हणून वरिष्ठांना विनंती केली त्यानंतर डिजिटल बातमी प्रसिद्ध केल्याचा राग येऊन कैलास आहिरे यांनी फोनवरून दंडगव्हाळ यांनाअर्वाच्य भाषेत गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्या दोन-तीन दिवस याबाबत दंडगव्हाळ यांची कोणतीही कारवाई करण्याची हिम्मत झाली नाही परंतु अन्य एका दैनिकाच्या प्रतिनिधीने दंडगव्हाळ आणि कैलास आहिरे यांच्यातील टेलिफोनवर झालेले संभाषण समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र चे राज्य सहसचिव सतीश रुपवते व अन्य जिल्हा पदाधिकाऱ्यांनी पोलीस पत्रकार ग्रुपवर तीव्र प्रतिक्रिया नोंदविल्यानंतर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी याप्रकरणी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले त्यानुसार पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेत तथ्य असल्याचा निष्कर्ष काढून नगरसेविकेचा पति कैलास आहिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया नाशिक जिल्हाप्रमुखाने ही ट्विटर अकाउंट वरून राज्यस्तरीय प्रतिष्ठित वृत्तवाहिनीच्या महिला प्रतिनिधीला अश्लील शब्दात कॉमेंट करून रिप्लाय दिला होता याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री यांनी दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला ओझर पोलिसांनी अटक केल्याचा प्रकार ताजा असताना भाजपा नगरसेविकेच्या पतीने प्रतिष्ठित दैनिकाच्या प्रतिनिधीला गंभीर स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा दुसरा प्रकार उघडकीला आला आहे.

करोना संकटाच्या काळात समाजातील डॉक्टर पोलीस नर्सेस सफाई कर्मचारी यांना सैनिक म्हणून सन्मान मिळत असताना जीवाची परवा न करता कोणत्याही संरक्षणाशिवाय व शासन आणि समाजाकडून देखील कोणत्याही संरक्षणाची हमी नसताना सामाजिक आणि व्यवसायिक कर्तव्याच्या भावनेने कार्य करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण आणि आणि धमक्यांना सामोरे जावे लागत आहे, अशांना वेळीच आवरण्याचा ताकद लोकशाहीच्या निर्भिड चौथ्या स्तंभात आणि वेळीच तक्रारीची दखल घेणा-या कर्तव्यदक्ष पोलीस अधिका-यात आहे आणि याबद्दल एनयुजेमहाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.