पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे जिल्हास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धा

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसतर्फे जिल्हास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धा

पिंपरी, दि. १० (प्रतिनिधी) – लहान मुलांच्या कल्पकतेला वाव देणाऱ्या आणि आपल्या इतिहासाबद्दल जागरुकता निर्माण करणाऱ्या निसर्ग, पाणी, माती, चिखल आदींशी स्वच्छंदी मनाने एकरुपता साधता यावी, यासाठी पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने “ जिल्हास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धा ” आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचा कालावधी दिनांक ८ ते १३ नोव्हेंबर दरम्यान असून या किल्ल्यांचे परिक्षण दिनांक १३ नोव्हेंबर रोजी केले जाणार आहे. तरी या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 7218851885 या क्रमांकावर स्पर्धकाचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक व्हॉट्सअपवर पाठवावा, तसेच या उपक्रमाला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा. असे आवाहन स्पर्धेचे संयोजक महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव चंद्रशेखर जाधव यांनी केले आहे.