चांदे बुद्रुक मुस्लिम कब्रस्तानमध्ये वृक्षारोपण

चांदे बुद्रुक मुस्लिम कब्रस्तानमध्ये वृक्षारोपण

कर्जत : चांदे बुद्रुक येथील मुस्लिम कब्रस्तान तसेच देवस्थान परिसरात मुस्लिम समाजाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रजातीची सुमारे दीडशे झाडे यावेळी लावण्यात आली.

त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक चाँद मुजावर, अमोल खोमणे, हसन शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते विशाल भंडारी, संपत गावडे, इनुस सय्यद, आवेश सय्यद, शाहरुख शेख, नितीन जगधने आदी उपस्थित होते