रणजित डिसले अमेरिकेला रवाना…

रणजित डिसले अमेरिकेला रवाना...

हेरंब कुलकर्णी

आज पहाटे रणजित डिसले फुलब्राईट शिष्यवृत्ती च्या ६ महिन्याच्या अभ्यासासाठी अमेरिकेला रवाना झाला. माझ्या राज्यातील ही जागतिक शिष्यवृत्ती मिळालेला तो पहिला शिक्षक आहे याचा मला अभिमान आहे.

विमानतळावर तिरंगा घेऊन काढलेला त्याने फोटो पाठवला तेव्हा मन भरून आले.रणजितला देशाचा अभिमान वाटतोय पण आम्हाला मात्र त्याचा अभिमान वाटला नाही तर आम्ही त्याला शिक्षणक्षेत्रावरील कलंक ठरवला…

अवघ्या ३४ वर्षाचा हा पोरगा उरलेल्या आयुष्यात अनेक प्रकारे कर्तृत्व दाखवेल याची मला खात्री आहे….काही गोष्टींना काळ हेच उत्तर असते.

त्याने चुका केल्या की नाही? हे चौकशी समिती ठरवेल, त्यावर कारवाया त्याला कोर्टात आव्हान हे सर्व काही होईल, पण त्या वादा वादीपलीकडे एका खेड्यात काम करणारा एक प्राथमिक शिक्षक आज अमेरिकेत एक प्रतिष्ठित शिष्यवृत्ती मिळवतोय याचा अभिमान वाटतो.

शिक्षण व्यवस्थेवर त्यातील घटकांवर माझ्याइतकी टीका कोणी केली नसेल पण ते करताना गुणवंत प्रतिभावान शिक्षकांचे,अधिकाऱ्यांचे भरभरून कौतुक करणे, हे ही करत आलोय.व्यवस्थेवर टीका आणि व्यवस्थेतल्या गुणी माणसांचे मॉडेल गौरवणे हे दोन्हीही करत राहतो…सर्वांनीच करायला हवं.