काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांच्या तिसऱ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांच्या तिसऱ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पिंपरी : काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांच्या काळेवाडी-रहाटणी परिसरातील तिसऱ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले. हा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

त्यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सायली नढे, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिरा जाधव, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, हरीनारायण सर, विजय ओव्हाळ, विशाल सरोदे, आबा खराडे, उमेश खंदारे, छाया देसले, काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष गणेश नांगरे, किरण नढे, अजय काटे, आनंद काटे, प्रकाश नांगरे, प्रकाश पठारे, सोहेल शेख, सिद्धार्थ कसबे, रिहान शेख, गौतम ओव्हाळ, प्रथम नांगरे, आशा नांगरे, हिरा साळवी, राधा काटे, निर्मला गजभिव, सुनिता खैरमोडे, नंदिनी नांगरे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांच्या तिसऱ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

डॉ. कैलास कदम म्हणाले की, स्थानिक पातळीवर ज्या समस्या चालू आहेत. त्या अनुषंगाने काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तरी कोणत्याही प्रकारची समस्या, अडचण असल्यास हक्काने या कार्यालयात संपर्क साधावा. विशेष म्हणजे या कार्यालयात नवीन मतदार नोंदणी, पॅन कार्ड, आधार कार्डचे स्मार्ट कार्ड, ई-श्रम कार्ड इत्यादी सेवा मोफत पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे सदस्य नोंदणी अभियान २०२२ राबविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व घेऊन अनेक सोयींचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ. कदम यांनी केले.

डॉ. कदम पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर उभारण्यात काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. औद्योगिकीकरण, सरकारी दवाखाने, राजीव गांधी आयटी पार्क तयार करून घेण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे.

नरेंद्र बनसोडे म्हणाले की, मुळात काळेवाडी परिसरात काँग्रेसची विचारधारा मानणारा मोठा वर्ग आहे. काळेवाडीचा राजकीय इतिहास पाहता, अनेक लोकप्रतिनिधी काँग्रेसमधून निवडून आले. नंतर त्यांनी इतर पक्षात प्रवेश केला. त्यामुळे काळेवाडीत रवि नांगरे यांच्या माध्यमातून युवा नेतृत्व देणार आहोत. या जनसंपर्क कार्यालयातून काळेवाडी परिसरातील अनेक तरूणांना काँग्रेसशी जोडण्याचे काम केले जाणार आहे.

काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे यांच्या तिसऱ्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

या प्रसंगी बोलताना रवि नांगरे म्हणाले की, काँग्रेस हा सर्व धर्म समभाव, लोकशाही व मानवहीत जपणारा, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असणारा एकमेव पक्ष आहे. आपल्या काळेवाडी परिसरातील सर्व नागरीकांसाठी चांगले काम करण्याचा माझा संकल्प आहे. काळेवाडी परिसर सर्व सुख-सोयींनी संपन्न असावा असे माझे स्वप्न आहे, व या माझ्या संकल्पपुर्ती व स्वप्नपुर्तीसाठी मला आपल्या सहकार्याची, मार्गदर्शनाची, सुचना व आशिर्वादाची गरज आहे.

रवि नांगरे पुढे म्हणाले की, नगरसेवक हा जनतेचा व नगराचा सेवक असतो. या कारणास्तव येणाऱ्या महापालिकेच्या निवडणूकीत मी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे. तरी आपण माझ्या सारख्या सुशिक्षीत उमेदवारास येणाऱ्या निवडणुकीमध्ये संधी द्यावी. ही नम्र विनंती.