जाधववाडी-मोशी रस्त्यावरील धोकादायक चेंबर दुरूस्त करण्याची मागणी

जाधववाडी-मोशी रस्त्यावरील धोकादायक चेंबर दुरूस्त करण्याची मागणी

बाळासाहेब मुळे: लोकमराठी वृत्तसेवा

पिंपरी : जाधववाडी-मोशी हा हाय स्ट्रीट नावाने प्रसिद्ध असलेला रोड. परंतु, त्याच रोडवरच्या फुटपाथवरील असणाऱ्या ड्रेनेजचे काम अर्धवट ठेवलेले आहे. ही बाब अत्यंत धोक्याचे असून फुटपाथवरून येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी अपघाताला आमंत्रण देणारी बाब आहे.

हा रोड अत्यंत महत्त्वाचा असून या रोडच्या बाजूने शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स आणि गार्डन आहेत. त्यामुळे हा रोड अत्यंत रहदारीचा असल्यामुळे त्या रोडवरती उघडे पडलेले चेंबर्सचे काम करुन घ्यावे. अशी मागणी सामान्य जनतेतून व येणाऱ्या-जाणाऱ्या पादचार्‍यांना कडून हमेशा होत आहे. याची सूचना महापालिकेला आणि लोकप्रतिनिधींनाही वारंवार देऊन त्याच्याकडे जाणून बुजून कानाडोळा केला जात आहे. लोकप्रतिनिधी किंवा पालिका कुठला तरी मोठा अपघात होण्याची वाट पाहते, की काय? अशीच काहीशी शंका जनतेमध्ये निर्माण होत आहे.

Actions

Selected media actions