हडपसर (प्रतिनिधी) : एस. एम. जोशी कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा केंद्रातील आनंद आवारे, रमेश शेलार, सीमा किंकर, छाया कानपिळे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी (PSI) निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत खिलारे यांनी त्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.राजेंद्र ठाकरे, प्रा.डॉ.शकुंतला सावंत तसेच सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवकांनी त्यांचे अभिनंदन केले.