माळी समाजाच्या मोफत राज्यस्तरीय वधू, वर परिचय मेळाव्याचे भोसरीत आयोजन

माळी समाजाच्या मोफत राज्यस्तरीय वधू, वर परिचय मेळाव्याचे भोसरीत आयोजन

भोसरीतील श्री संत शिरोमणी सावता महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने माळी समाजाचा सोळावा वधू, वर परिचय मेळावा रविवार दि. २७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यास वधू, वर व पालकांना मोफत प्रवेश आहे अशी माहिती मेळावा प्रमुख शामराव गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

या मेळाव्यात सहभाग घेण्यास इच्छुक असणा-या वधू, वर किंवा पालकांनी संस्थेचे नोंदणी कार्यालय श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, महेशदादा स्पोर्टस्‌ फाऊंडेशन, महादेव मंदिराजवळ लोंढे आळी, भोसरी पुणे – ३९ येथे दुपारी ४ ते सायंकाळी ७:३० पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष शांताराम ताम्हाणे व उपाध्यक्ष संतोष लोंढे यांनी केले आहे. रविवार दि. २७ मार्च २०२२ रोजी सकाळी ९ वाजता मेळाव्याचे उद्‌घाटन भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात होणार आहे.

नोंदणी केलेल्या वधू, वरांनी आपल्या पालकांसमवेत उपस्थित रहावे. नोंदणीसाठी संपुर्ण बायोडाटा, जन्मपत्रिका झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. नोंदणीसाठी मेळावा प्रमुख शामराव गायकवाड – ९८२२३२४१६१, पंढरीनाथ राऊत – ९८५०७६५७३०, मच्छिंद्र दरवडे – ९९२२२१६६८५५, तुकाराम ताठे – ९०११०१६९००, शंकर लोंढे – ९९६०३२५६०४, हनुमंत लोंढे – ९८५०८४११३७, उत्तम गायकवाड – ९७६३४४५७७६, सुरेश मेहेर – ७५८८०७१२५७ यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.