संघर्ष संस्था प्रतिष्ठानतर्फे गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी

संघर्ष संस्था प्रतिष्ठानतर्फे गणेश उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

मोशी, ता. ७ सप्टेंबर : मोशी प्राधिकरण येथील सेक्टर नंबर चार मध्ये गेली 21 वर्षाची परंपरा असलेला मानाचा राजा गणपती उत्सव संघर्ष संस्था प्रतिष्ठानच्या वतीने याही वर्षी मोठ्या थाटामाटात आयोजित केलेला आहे. संघर्ष संस्था प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पवार यांनी उत्सवामध्ये गेली आठ दिवसांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी प्रभागातील सर्व गणेश भक्तांसाठी आयोजित केली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून रोज विविध कार्यक्रम घेतले आहेत, त्यामध्ये लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, चमचा लिंबू, स्लो सायकल स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू बनवणे स्पर्धा, तरुण मुला मुलींचे डान्स स्पर्धा, नाट्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, महिलांसाठी फुगड्या स्पर्धा, न्यू होम मिनिस्टर आणि मानाची पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला.

या गणेशोत्सवामध्ये गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या सर्व स्पर्धा मधील विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी नगरसेविका नम्रता लोंढे, हनुमंत लांडगे, तुषार सहाने, निलेश बोराटे, विलास मडगिरी, वसंत बोराटे, विजय लोखंडे व आदी मान्यवरांनी या कार्यक्रम प्रसंगी आपली उपस्थिती लावून गणेशोत्सवानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व याप्रसंगी संघर्ष संस्था प्रतिष्ठानचे संस्थापक पंकज पवार यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे सन्मान करण्यात आले. तसेच उद्या दिनांक 8 सप्टेंबर रोजी संत नगरच्या राजाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरामध्ये मोठ्या थाटामाटात निघणार आहे असे संघर्ष संस्था प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पवार यांनी सांगितले.