स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात कु.गायत्री गायकवाड हिचा सत्कार

रिसोड प्रतिनिधी शंकर सदार: रिसोड इथून जवळच असलेल्या धोडप बु. येथील स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात कु.गायत्री संतोषराव गायकवाड हिचा मुंबई येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवायोजनेतून पथसंचालनामध्ये तिची निवड झाल्याने शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.

स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात कु.गायत्री गायकवाड हिचा सत्कार

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सज्जनराव बाजड प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य दिगंबररावजी मवाळ, प्राचार्य विनोद पाटील नरवाडे संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड यांनी आज स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण मेडिकल व इंजीनियरिंग च्या मागे लागलेला आहे पण मुलांना काय आवडते तेओळखून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे निश्चितच विद्यार्थी दैदीप्यमान यश प्राप्त करू शकतात असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी सांगितला.प्राचार्य मवाळ सर यांनी आपल्या मनोगत आतून महागाव सारख्या छोट्याशा खेड्यांतील मुलीने हे दैदीप्यमान यश प्राप्त केले हे तुम्हा आम्हा सर्वांसाठी प्रेरणा देणारे आहे असे गौरवोद्गार काढले.

प्राचार्य विनोद पाटील नरवाडे यांनी तिच्या अंगी जिद्द मेहनत चिकाटी ह्या गोष्टी असल्यामुळेच तिला हे यश मिळू शकले म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा तिच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. आपल्या अध्यक्ष भाषणातून मुख्याध्यापक सज्जनराव बाजड यांनी गायत्रीचा बालपणापासून तू आतापर्यंत सर्व शैक्षणिक प्रवास आपल्या मनोगतातून व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना कु.गायत्रीने माझ्यावर माझ्या कुटुंबाचे माझ्या गुरुजनांचे व आपल्यासारख्या ज्येष्ठ मंडळीचे आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी असल्याने मी हे यश संपादन करू शकले असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपण ग्रामीण भागातले आहोत म्हणून स्वतःला कमी न लेखता आपल्यामध्ये सुद्धा क्षमता असतात त्या ओळखून त्याप्रमाणे मार्गदर्शन करा तुम्हाला सुद्धा यश मिळते असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप भिसडे यांनी केले व आभार प्रदर्शन विजय आढाव यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली होती.