Tag: Babasaheb Purandare

कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार
विशेष लेख

कुबेर म्हणजे पुरंदरेंचा इंग्लिश अवतार

डॉ श्रीमंत कोकाटे 'रेनिसां 'ही व्यापक संकल्पना आहे. पंधराव्या शतकात रोमन साम्राज्यात रेनिसां झाला. त्यामुळे कला, शिल्पकला, साहित्य, विज्ञान, संगीत, चित्रकला यांचा विकास झाला. धार्मिक गुलामगिरीला आव्हान दिल्यामुळे अनिष्ट रूढी, परंपरा याविरुद्ध लढा उभारला गेला. ग्रंथप्रामाण्य नाकारून बुद्धिप्रामाण्यवादाला चालना मिळाली. धर्मगुरूंच्या आणि धर्मग्रंथांच्या जाचातून मुक्त होऊन युरोपमध्ये नवविचारांचा उदय झाला. त्यातूनच युरोपमध्ये औद्योगिक आणि आर्थिक क्रांती झाली. हजारो वर्षापासून गुलामगिरीमध्ये जखडलेल्या जनतेला प्रबोधन चळवळीमुळे जगण्याची नवी उमेद मिळाली. रेनिसांमुळे त्यांना नवनिर्मितीची संधी मिळाली. वैचारिक क्रांती झाली. त्यातून कला, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञानाचा उदय आणि विकास झाला. धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून पोसलेल्या कर्मठ, सनातनी परंपरेला शह दिल्यामुळे युरोपमध्ये रेनिसां झाला....