मावळ येथे “सौभाग्यवती २०२३ ” खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड कार्यक्रम उत्साहात संपन्न
मावळ, दि.१६ (लोकमराठी) - पुणे (ता.मावळ) येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजपा महिला आघाडी, भाजपा मावळ तालुका महिला अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे व नाणे मावळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने "सौभाग्यवती २०२३ " खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे , दूध संघाचे डायरेक्टर बाळासाहेब नेवाळे, राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारिका संजय भेगडे, लोनावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी, बाळासाहेब घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महिलांना ...