Tag: Camil parkhe

विशेष लेख

बोलावणे मिशनरीसेवा व्रताचे आणि पत्रकारीतेचे

कामिल पारखे रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्वशैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना 'जय ख्रिस्त' म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी बोलू लागले. हरेगावचे मतमाऊली तीर्थक्षेत्र आणि (शेजारी) बल्गेरियाची राजधानी सोफिया येथे बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, ''पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?'' माझ्या वडिला...
पंचहौद मिशन चहापान, भारतीय पत्रकारितेतील पहिले स्टिंग ऑपरेशन
विशेष लेख

पंचहौद मिशन चहापान, भारतीय पत्रकारितेतील पहिले स्टिंग ऑपरेशन

कामिल पारखे गोपाळराव जोशी हे अर्वाचीन महाराष्ट्रातील एक वादग्रस्त पात्र आहे. अमेरिकेत जाऊन डॉक्‍टर होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला असलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती अशीच गोपाळराव जोशी यांची प्रामुख्याने ओळख आहे. पुण्यातील त्याकाळच्या अनेक थोर व्यक्तींना गणपतरावांनी आपल्या विविध चाळ्यांनी आणि उपद्‌व्यापांनी घाम फोडला होता. पुण्यातील पंचहौद चर्चमधील चहापान किंवा ग्रामण्य प्रकरण या गोपाळरावांनी निर्माण केलेल्या वादात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, न्यायमुर्ती म. गो. रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वगैरेंसारखे भलेभले लोक अडकले. पंचहौद चर्च-पवित्र नाम देवालय किंवा होली नेम कॅथेड्रल विशेष म्हणजे हे चहापान प्रकरण हा वाद गोपाळरावांनी अगदी ठरवून, त्यात अनेक लोकांना गोवून घडवून आणला होता आणि नंतर पुणे वैभव या वृत्तपत्रात आपल्या बायलाईनसह बातमी छापून त्यात पुण्यातील या ...

Actions

Selected media actions