India Fights Corona : “श्री फाउंडेशन” तर्फे पोलिसांना सॅनिटायझर, टिसू व मास्कचे वाटप
लोकमराठी न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सॅनिटायझर बाजारातून गायब झाले आहे. तर अनेक ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार सुरु आहे. असे आढळून आल्याने "श्री फाउंडेशन" च्या वतीने वाकड पोलिस ठाणे व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पासपोर्ट विभाग येथे 70 पोलिस कर्मचारींना नुकतेच सॅनिटायझर, टिसू व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.
“कोरोना” चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किमान 20 सेकंद साबणाने हात धुवावेत व बाहेरुन आल्यानंतर हाताला सॅनिटायझर लावावे. असे श्री फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सुशांत पांडे यांनी सांगितले.
तसेच यावेळी पासपोर्ट विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजण यांनी कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी, याची माहिती दिली. सर्दी, ताप, खोकला तसेच श्वसनाचा त्रास होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा, असेही आवाहन केले. यावेळी पोलीस ...