Tag: MP Sanjay Singh

खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित
पुणे, राजकारण

खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित

पुणे : आम आदमी पार्टी युवा आघाडीचे महाराष्ट्र युवा अधिवेशन रविवारी (ता. ३१ जुलै) बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होत आहे. या अधिवेशनाला आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार संजय सिंग (Sanjay Singh) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे 'आप' युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खा. संजय सिंग यांच्याबरोबरच दिल्ली विधानसभेचे सर्वात तरुण आमदार कुलदीप कुमार व गोव्याचे आमदार वेंझी वेगस यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे. या अधिवेशनामध्ये रोजगार, शिक्षण, आरोग्य, राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांचा सहभाग या काही प्रमुख विषयांवर चर्चा होणार असल्याचे युवा आघाडी उपाध्यक्ष व अधिवेशनाचे समन्वयक संदीप सोनवणे यांनी सांगितले. खा. संजय सिंग यांचे आगमन सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन होणार असून ते 11:15 वाजता बिबवेवा...