Tag: Reporter

पत्रकारच एकमेकांचे शत्रू
विशेष लेख

पत्रकारच एकमेकांचे शत्रू

अॅड. संजय माने कोणत्याही व्यवसायिकांची संघटना ही संघटित झालेल्या सदस्यांच्या हितासाठी काम करत असते. नवीन काही करू इच्छिणाऱ्यास प्रोत्साहन दिले जाते. कधी एखाद्या सदस्याकडून चुकीचे कृत्य घडले तर त्याला वाचविण्यासाठी संघटना प्रयत्न करत असते. इतर सर्व संबंधिताला सावरण्याचा प्रयत्न करत असतात, पत्रकारितेत मात्र उलट दिसून येते. एखादा सहकारी काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला अडचणी निर्माण केल्या जातात, अडचणीत असेल तर तो आणखी कसा अडचणीत येईल यासाठी प्रयत्न केले जात असल्याने पत्रकारच पत्रकारांच्या जीवावर उठल्याच्या घटना विविध ठिकाणी घडू लागल्या आहेत. समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठविणारे पत्रकार आपलाच कोणी सहकारी चुकीचे काम करताना आढळून आल्यास त्यालाही सोडत नाहीत, अशा भूमिकेतून तसेच निष्पक्ष हेतूने काही होत असेल तर ही माध्यमांची प्रतिमा उंचावण्यास चांगलीच बाब आहे. पण अ...