रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्रातील कामगीरीकडे देशाचे लक्ष – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.२३. (लोकमराठी) - देशभरात रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढत आहे. ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाला राजकीय यश लाभत आहे. नुकत्यात झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडुन आले. देशभरात रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चर्चा झाली. त्यामुळे येणा-या मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष किती जागांवर विजय मिळवतो . आगामी काळेात महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष काय राजकिय कामगिरी करणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांत आपले उमेदवार निवडुन आणण्याची कामगिरी करून दाखवावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
गोराई येथील हॉटेल बेव्हयु सभागृहात आमचे रामदास आठवले या गीताच्या ध्वनीचित्रफितीचे ना.रामदास आठवले ...