Santosh Deshmukh : प्रिय संतोष देशमुख, तुमच्या खूनाचे फोटो मी बघितलेच नाहीत - हेरंब कुलकर्णी
तुमचे ते फोटो काल सगळीकडे दाखवले जाताना बघण्याची हिम्मतच झाली नाही...बघण्याची आमची हिंमत नाही,तुम्ही ते कसे सहन केले असेल ? ती नुसती वर्णनेच मनात भीतीची वादळे आणतात...थरकाप होतो. आणि बघून तरी मी काय करू ? माझी हतबल भेकड अगतिक अवस्था मलाच लज्जित करते संतोष....असे ठिकठिकाणी घडताना आपण जिवंत आहोत आणि तितकेच असहाय आहोत याने जास्त त्रास होतो...त्यापेक्षा ते बघूच नये असे वाटते. ते अज्ञान एक बनचुकी क्षुद्र सुरक्षितता देते...केवळ कल्पनेनेच बघुन त्यातील क्रौर्य अनुभवले..क्षणभर त्या जागी स्वतःला ठेवून भयचकित झालो. मृत्यू क्षणाक्षणाला जवळ येताना आणि जीवाची काहीली होताना...सहन होत नसताना पाईप तुटेपर्यंत होणारी मारहाण...मृत्यूच सुटका करील यातून अशी अगतिक मन:स्थिती आणि अखेरच्या क्षणी बायको मुलांचे डोळे समोर येताना डोळ्यात अश्रू येताना समोर निर्लज्ज हसणारे हैवान...आणि शेवटी लायटर ने डोळे जाळल्यावर फक्त अ...