CHINCHWAD : थेरगाव बटरफ्लाय ब्रिज गैरव्यवहाराची सखोल चौकशी करा - आमदार जगताप
सात वर्षे रखडलेल्या पुलाच्या कामाकडे वेधले सरकारचे लक्ष
मुंबई, ८ मार्च : चिंचवड-थेरगाव दरम्यानच्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामातील कथित गैरव्यवहारावर आमदार शंकर जगताप (MLA Shankar Jagtap) यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सदर पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित ठेकेदार, सल्लागार आणि (PCMC) महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
२०१७ मध्ये २८.७१ कोटींच्या निविदेने कामाला सुरुवात
थेरगाव (Thergaon) येथील प्रसून धाम हाउसिंग सोसायटीजवळून चिंचवड-थेरगाव जोडणाऱ्या बटरफ्लाय ब्रिजच्या कामासाठी २०१७ साली धनेश्वर कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला २८ कोटी ७१ लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे ही निविदा मूळ अंदाजपत्रकाच्या १४ टक्के अधिक दराने मंजूर करण्यात आली होती.
वेळेवर काम न झाल्याने दोनदा मुदतवाढ
मूळ...