Tag: Shirur news

पत्रकारास मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – सुरेशकुमार राऊत
पुणे

पत्रकारास मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – सुरेशकुमार राऊत

शिक्रापूर : एखाद्या बातमीचा राग मनात धरून पत्रकारांवर हल्ले करणे हि बाबत अतिशय चुकीची असून पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांची गय केली जाणार नसून सध्या पत्रकारास मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले. शिंदोडी ता. शिरुर येथील पत्रकार तेजस फडके यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्या संदर्भात बातमी केलेली असताना त्या बातमीचा राग मनात धरून गावातील काही समाज कंटकांनी तेजस फडके यांच्यावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले होते. याबाबत तेजस फडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत शिरूर तालुक्यातील पत्रकारांनी नुकतीच पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांची भेट घेत, आरोपींना तातडीन...