एस.एम.जोशी महाविद्यालयात शिक्षक कृतज्ञता दिन साजरा

एस.एम.जोशी महाविद्यालयात शिक्षक कृतज्ञता दिन साजरा

हडपसर : एस.एम.जोशी महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातील विध्यार्थ्याकडून शिक्षक कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. गेली दोन वर्षापासून कोरोनामुळे महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाईन पद्धतीने चालू असल्या कारणाने विद्यार्थ्यांना शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन तसेच यासारखे इतर दिवस साजरे करता आले नाहीत.

कोरोना परिस्थिती व लॉकडाऊन असतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी शिक्षक अविरतपणे ऑनलाईन पद्धतीने तसेच प्रसंगी ऑफलाईन पद्धतीने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एस. एम. जोशी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी शिक्षक कृतज्ञता दिन साजरा केला.

या प्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. एकनाथ मुंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अर्थशास्त्र विभागातील इतर सहकारी प्राध्यापक डॉ. विश्वास देशमुख, फुलचंद कांबळे, इम्तियाज सय्यद, नयना शिंदे उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पुस्तक व गुलाबपुष्प देऊन शिक्षकांचा सत्कार केला. या प्रसंगी शुभम शेंडे, ऋषिकेश शिंदे, भारती काळे, स्नेहल वाघमारे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.