एमपीफ पीसीएमसी बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेत टेड्रा फायटर्स व टीम ६४ संघाला विजेतेपद

एमपीफ पीसीएमसी बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेत टेड्रा फायटर्स व टीम ६४ संघाला विजेतेपद

पिंपरी : महेश प्रोफेशनल फोरम (एमपीफ पीसीएमसी) यांच्या तर्फे आयोजित ‘बॉक्स क्रिकेट लीग १. ०’ स्पर्धेत पुरुष गटात ‘टेड्रा फायटर्स’ तर, महिला गटात ‘टीम ६४’ या संघानी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

१० एप्रिल रोजी चोंधे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, विशालनगर येथे झालेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या गटात जय बंगच्या फलंदाचीच्या जोरावर ‘टेड्रा फायटर्स’ संघाने क्रिष्णा वॉरियर्स संघाचा ५ गडी राखून तर महिला गटामध्ये प्रिया राठीच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ‘टीम ६४’ संघाने ‘केपी क्वीन’ संघाचा ८ गडी राखून पराभव करून विजेतेपद संपादन केले. स्पर्धेमध्ये एकूण ८ संघानी सहभाग नोंदवला होता. सर्व संघांची निवड ही ऑक्षण पद्धतीने करण्यात आली होती.

एमपीफ पीसीएमसी बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेत टेड्रा फायटर्स व टीम ६४ संघाला विजेतेपद

महिला खेळाडू : वूमन ऑफ द सिरीस – अमृता लोहिया (संघ – केपी क्वीन), उत्कृष्ट गोलंदाज – प्रिया राठी (संघ – टीम ६४), उत्कृष्ट फलंदाज – अमृता लोहिया (संघ – केपी क्वीन)

पुरुष खेळाडू : मॅन ऑफ द सिरीस – अमोल भैया (संघ – क्रिष्णा वॉरियर्स), उत्कृष्ट गोलंदाज – अमोल भैया (संघ – क्रिष्णा वॉरियर्स), , उत्कृष्ट फलंदाज – मनोज मालपाणी (संघ – टेड्रा फायटर्स’), उत्तम यष्टिरक्षक – सुदीप लड्ढा (संघ – क्रिष्णा वॉरियर्स)

स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रेसिडेंट मनोज मालपाणी, डायरेक्टर गोपाल धूत, प्रेसिडेंट इलेक्ट प्रसन्ना राठी, डॉ संदीप बाहेती, स्पर्धेचे स्पॉनसोर्स प्रसाद जाखोटिया, नलिनी नवाल, स्वाती धूत, संघांचे मालक सागर नावंदर, शुभम मंत्री, गणेश गट्टाणी, रवी चांडक, मनोज चांडक, अजय लड्ढा, प्रदीप राठी व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.