पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घाला ; आम आदमी पार्टीची मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घाला ; आम आदमी पार्टीची मागणी

पिंपरी, ता. 13 : पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घाला. अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आपच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय येथे अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

त्यामध्ये असे म्हटले आहे की आम आदमी पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष यशवंत कांबळे यांच्यावरती तीन गुन्हेगारांनी गांजाची नशा करून कोयत्याने खुनी हल्ला केला. अशी अनेक प्रकरणे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये घडत आहेत, व्यसनाधीन होऊन जनतेच्या गाड्या अडवून त्यांना कोयत्याने मारहाण केली जाती व लुटले जाते असे प्रकार मोठ्या प्रमाणावर ती पिंपरी-चिंचवड शहरात होत आहे. त्यावरती पोलीस प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचे आहे. अशा गुन्हेगारांवर ती आळा घालणं गरजेचे आहे, शहरांमध्ये अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत, ते त्वरित बंद करावेत. अशी आम आदमी पार्टीकडून मागणी करण्यात आली.

यावेळी पुणे जिल्हा सामाजिक न्याय विंग अध्यक्ष वहाब शेख, पिंपरी-चिंचवड सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष विजय आब्बड, पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, पिंपरी-चिंचवड महिला अध्यक्ष स्मिता पवार, शहर प्रवक्ते प्रकाश प्रवक्ते कपिल मोरे, डॉक्टर अमर डोंगरे, नंदू नारंग, सद्दाम पठाण सचिव सामाजिक न्याय विंग पिंपरी चिंचवड़ शहर, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.