डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी

रहाटणी : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका आसावरी घोडके, पुरुषोत्तम गाणार (सामाजिक कार्यकर्ते ), माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
पुरुषोत्तम गाणार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले. यानंतर बुध्द वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी खाऊ वाटप करण्यात आला.

“प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असून त्याला स्वत:ला एक अस्मिता आहे. याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका जातीतल्या लोकांना नाही, तर समस्त लोकाना उद्देशून म्हटले आहे की, गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या तो नक्की बंड करून उठेल,” असे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू राठी यांनी केले व सचिन कळसाईत यांनी आभार मानले. भारताच्या संविधान प्रस्ताविकेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.