अभिमान स्कूलमध्ये बालचमूंचे स्वागत

अभिमान स्कूलमध्ये बालचमूंचे स्वागत

निगडी : प्राधिकरणामधील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे अभिमान इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत शिक्षकांनी स्टीकरच्या माध्यमातून केले. वर्ग सुशोभित करण्यात आले होते.

फुले, फुगे, स्टीकरर्स असे रंगबिरंगी सजावट करण्यात आली होती. मुलांसोबत शिक्षकांनी ही बालनृत्य केले. पहिल्याच दिवशी चॉकलेट देऊन मुलांचे तोंड गोड केले. वर्गात प्रवेश करताना विद्यार्थ्यांने ज्या स्टीकरची निवड केली त्यानुसार त्यांचे स्वागत करण्यात आले. इयत्ता सहावीच्या व सातवीच्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून मुलांचा आनंद द्विगुणित केला.

विद्यार्थ्यांचे असे स्वागत बघून सर्वच बालचमू आनंदी व उत्साही दिसत होते. या सर्व कार्याबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती व कार्यकारिणी सभासदांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता भोसले यांचे कार्यक्रमास सहकार्य व मार्गदर्शन लाभले.