मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त ५४ मनसैनिकांचे उत्स्फूर्त रक्तदान

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त ५४ मनसैनिकांचे उत्स्फूर्त रक्तदान
  • शहर उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पिंपरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. ३१ काळेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात प्रभागातील ५४ मनसैनिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. महिला सेनेच्या शहर उपाध्यक्षा अनिता पांचाळ (Anita Panchal) यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त ५४ मनसैनिकांचे उत्स्फूर्त रक्तदान

यावेळी मनसेचे (MNS) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला शहराध्यक्ष अश्विनी बांगर, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, राजू भालेराव, बाळा दानवले, राजू साळवे, दत्ता देवतरासे, शहर सचिव सीमा बेलापूरकर, रुपेश पटेकर, हरेश नखाते, वैशाली बोत्रे, अनिता नाईक, सिमा परदेशी, राजू अवसरे, मयूर चिंचवडे, आकाश लांडगे, रॉबिन त्रिभुवन, अक्षय पारखे, हर्षल कोळेकर, वरूण रिद्धिवाडे,अनिकेत प्रभू सुशांत साळवी अक्षय नाळे प्रज्वल वाघमारे, वैशाली कोराटे,डी एम कोळी नारायण पठारे, विशाल साळुंखे, सूरज शेख, आशिष पांचाळ, हरी पांचाळ, आशु साळुंखे, पल्लवी पाटील, ज्योती पाटील, संजय गायके, जेष्ठ नागरिक श्री. जोशी काका, सुशील मिरगल, प्रवीण खरात, अनिता पाटील, राहुल कोलट, श्लोक पांचाळ, विनोद साळुंके, नितीन पिचारे, दामोदर कर्पे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त ५४ मनसैनिकांचे उत्स्फूर्त रक्तदान

याप्रसंगी आयोजक अनिता पांचाळ, आकाश पांचाळ आणि बालाजी पांचाळ यांच्या वतीने राज ठाकरे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी पंचनाथ चौक येथील पंचनाथ देवस्थान व देवीच्या मंदिरात त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

दरम्यान, आयोजकांच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला छत्री भेट देण्यात आली. तसेच प्रत्येक रक्तदात्याचे आभार व्यक्त करण्यात आले.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त ५४ मनसैनिकांचे उत्स्फूर्त रक्तदान