व्यसनमुक्ती का व कसे

व्यसनमुक्ती का व कसे 

दत्ता तुमवाड

व्यसनमुक्ती झालीच पाहिजे. हे निर्विवाद आहे. कारण व्यसनाचे दुष्परिणाम त्रासदायक आहेत. म्हणून व्यसनी माणूस आपल्या मुलांना सावध करतो की मी फसलो तू फसू नको. कारण व्यसनामुळे कुणाचे भले झाले नाही. नुकसान हे ठरलेलेच आहे. पुढच्याच ठेस मागचा शहाणा म्हणतात. पण या विषयात तसे घडताना दिसत नाही. मुलाला माहीत असते की व्यसनामुळे माझा बाप हा साप बनून घरातील सर्वांना कसा त्रास देत होता. तरी मुलगा बापाचे अनुकरण करतोच. असे का घडते? यावर संशोधन झाले पाहिजे. व्यसन हे चांगल्या गोष्टींचे पण जडते. पण त्याचे चांगलेच परिणाम दिसतात.

पण वाईट गोष्टीचे व्यसन जडले तर मात्र तयाचे दुष्परिणाम होतातच. ज्या कुटुंबात व्यसनी माणसे ते कुटुंब उध्वस्त होते. तेथील शांती भंग पावते. आणि ज्या देशातील जनता व्यसनी तो देश उध्वस्त होतो. त्या देशातील शांती भंग पावते. त्या देशाचे सामाजिक आर्थिक जीवन उध्वस्त होते. सामाजिक आर्थिक वावस्था बिघडते. पूर्वी हातभट्टीची दारू असायची कारण कारखाने तयार करत नव्हते. परंतु हातभट्टी क्या दारूत नवसागर चा वापर जास्त असल्याने माणसे मारायला लागली. मग कारखान्यात तयाररत होऊन देशी पिने सुरू झाले. श्रीमंत विदेशी पिऊ लागले.

तरुण बियर पिऊ लागले. आता तर गल्लोगलली दुकानात बियर मिळणार आहे. दारू शिवाय तंबाखू गांजा चरस बिडी सिगरेट गुटखा हे जोडीला आहेतच. तंबाखूजन्य वस्तूचे व्यसनामुळे कॅन्सर सारखे जीव घेणा रोग होऊन दरवर्षी लाखात माणसे मारू लागली. दारूने लिव्हर किडनीचे रोग होऊन माणसे मारायला लागली. तरी सरकारला देणे घेणे नाही. त्याला फक्त उत्पादन कर व विक्री कर लाऊन पिसे गोळा करायचे त. तिकडे कितीही माणसे मेली; कितीही कुटुंब उध्वस्त झाली तरी त्याला काहीच देणे घेणे नाही. कसले हे मायबाप सरकार मडे पाडून टाळूवर चे लोणी खाणारे ? हे चित्र बंद झले पाहिजे.

व्यसनमुक्ती झाली पाहिजे. दोन पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत.

१. पिणाऱ्याच मानसिक बदल. ते होतच आहे. पोस्टर प्रदर्शन भाषणे कलापथक लिखाण या माध्यमातून प्रबोधन. हे तर आवश्यकच आहे.

२. व्यसन व्यवस्था बदलली पाहिजे. दारू व तंबाखूजन्य निर्मितीचे कारखाने; सरकारी परवाने ; वितरक कंपन्या ,; वाहतूक ; विक्रीचे दुकाने ही सारी यंत्रणा व्यवस्था बंद झाली पाहिजे. तरच प्रबोधनाचा उपयोग होईल. अन्यथा पालथ्या घड्यावर पाणीच. हे आपण पाहतच आलोय. भौतिक परिस्थिती म्हणजे व्यवस्था बदलल्या शिवाय उपदेश करून उपयोग होत नाही. प्यालाच खायलाच ओढायलाच नाही मिळाले तर व्यसनी लोकांचा नाईलाज होईल. आणि व्यसनमुक्ती आपोआप होईल. आयात बंदी काटेकोर पने करावी लागेल. पण या साठी सरकारची इच्छा होणे जरुरीचे आहे.

सरकार मानायला तयार नसेल तर केवळ याच प्रश्नावरून सरकार पडण्याची ताकत जनतेने दाखवून दिली पाहिजे. पन्नास टक्के महिला मतदान आहेच. पांचीस टक्के ना पिणारे पुरुष मतदान मिळून पंच्याहत्तर टक्के मतदान आडव्या बाटलीला झाले तर व्यसनमुक्ती पार्टीचे सरकार केंद्रात येईल. हे काहीच अवघड नाही. व्यसनमुक्ती व्हावी असे ज्यांना वाटते असे सर्व सामाजिक राजकीय धार्मिक महिला व पुरुष कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन किमान तीन वर्ष तरी प्रयत्नशील राहिले पाहिजे. अश्या प्रकारे मानसिक बदल व राजकीय बदल होणे गरजेचे आहे.