बाभळीच्या झाडांचे संवर्धन का करावे?

बाभळीच्या झाडांचे संवर्धन का करावे?

बाभळीचे झाड लावताना अनेक जण विचारतात, तूम्ही काटेरी झाड कसे काय लावता? आम्ही उत्तर तरी देणार काय? आमचे शिक्षण जेमतेम दहावी. आठवड्यातल्या सात दिवसापैकी चार दिवस जंगलातच असायचो. तीन दिवस शाळेत दोन दिवस मार खाण्यातच जायचो. पण निसर्गाने आम्हाला खूप काही शिकवले.

माणसाने बाभळीचे झाड पाडुन गुलाबाची शेती केली आणि कोटींच्या कोटी ऊडडाने घेतली. काटे तर गुलाबाला पण असतात. जसे एखादया स्त्रीला आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी माहेर सुरक्षित वाटते. तसेच अनेक जिवांना आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी हे बाभळीचे झाड सुरक्षित वाटते. जणु काही त्यांचे प्रसुतीगृहच पण माणसाने त्यावर कुराड चालवली आणि निसर्गाचा समतोल ढासळला.