सृजन करंडक 2019 आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत आबेदा इनामदार संघाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश


सृजन करंडक 2019 आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत आबेदा इनामदार संघाचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे ( लोकमराठी ) : आबेदा इनामदार महाविद्यालयाने नियोजनबद्ध खेळ करताना कावेरी कॉलेजचा 3-1 असा पराभव करून सृजन करंडक 2019 आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

जीडीएफएच्या ढोबरवाडी मैदानावर झालेल्या सामन्यात विजयी संघाला कावेरी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी केलेला कडवा प्रतिकार सहन करावा लागला. पूर्वार्धाथ 17व्या मिनिटाला अमित चव्हाणने केलेल्या गोलच्या जोरावर त्यांनी मध्यंतराला 1-0 शी आघाडी घेतली होती. उत्तरार्धाज जावेद अहमद याने 24व्या मिनिटाला गोल करून संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली.

भक्‍कम बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कावेरी महाविद्यालयाचे खाते प्रभास भांगे याने 32व्या मिनिटाला उघडले. मात्र, त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. अचूक नियोजन असणाऱ्या आबेदा महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व कायम राखले. आवेझ शेख याने 39व्या मिनिटाला गोल करून संघाचा विजय निश्‍चित केला.

निकाल :- आबेदा इनामदार कॉलेज 3 (अमित चव्हाण 17, जावेद अहमद 24, आवेझ शेख 39वे मिनिट) वि.वि. कावेरी कॉलेज 1 (प्रभास भांगे) मध्यंतर 1-0.