जयश्री इंगळे
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज भारताच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झालेत. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजे अजून दोन वर्षे असणार आहे. गेल्या काही वर्षातील सरन्यायाधीशांचा कार्यकाळ अल्प होता. त्यातही या पदापर्यंत पोहोचण्यापर्यंतची आणि पदावर असतांनाची कारकीर्द वादग्रस्त म्हणावी लागेल. (दीपक मिश्रा, बोबडे, गोगोई आणि लळीत).
सरन्यायाधीश चंद्रचूड यांची देखील भूतकाळातील कारकीर्द उल्लेखनीय आहे. अलिकडच्या काळातील अनेक ऐतिहासिक निकाल देणार्या खंडपीठांचा ते सदस्य होते आणि त्यांचे अनेक निर्णय उदारमतवादी आणि पुरोगामी आहेत.
त्यातील काही महत्त्वाचे निवाडे खालीलप्रमाणे:
1) 20 ते 24 आठवडे गर्भवती असलेल्या अविवाहित महिलांना विवाहित महिलांप्रमाणे सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार देणे.
2) वैवाहिक बलात्कार हा गुन्हा ठरवणे.
3) इच्छामृत्यूला आणि वैद्यकीय उपचार नाकारण्याचा एखाद्या व्यक्तीचा अधिकार मान्य करणे.
4) त्याचबरोबर विवादित रामजन्मभूमीवर हिंदूचा अधिकार एकमताने कायम ठेवणाऱ्या खंडपीठाचाही ते भाग होते.
5) न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला असा निवाडा देणार्या खंडपीठाचा देखील ते भाग होते.
6) सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष म्हणुन घटनापीठाला ‘पेपरलेस’ खंडपीठ म्हणून घोषित केले .
7) न्यायालयीन कार्यवाही YouTube द्वारे थेट प्रक्षेपण करण्यास अनुमती दिली.
8) साबरीमाला मंदिरात महिलांचा प्रवेश करण्याचा अधिकार त्यांनी कायम ठेवला.
9) समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी कक्षेतून बाहेर काढण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील त्यांच्या घटनापीठाने दिला.
त्यांच्या नुकत्याच एका वादग्रस्त निकालांपैकी एक म्हणजे त्यांनी
संविधान खंडपीठाचे प्रमुख न्यायमूर्ती म्हणुन “मूळ” शिवसेनेवरील शिंदे गटाच्या दाव्याचा निर्णय घेण्यापासून EC ला रोखण्याची मागणी करणारी शिवसेनेची याचिका फेटाळली.
मात्र चंद्रचूड यांची overall कारकीर्द पाहता ते निर्भीड, निष्पक्ष, स्पष्टवक्ते ,सुधारणावादी, व्यक्ति स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते , लोकशाहीचे समर्थक आणि अल्पसंख्यांकांचे हितचिंतक म्हणुन ओळखले जातात.
देशातील कुठल्याही मुद्द्यांवर ते निष्पक्षपणे, स्पष्टपणे कुठल्याही राजकिय किंवा सामाजिक दबावाला बळी न पडता ते वक्तव्य करतात. जज लोया प्रकरणात पुराव्यांअभावी सुटलेल्या लोकांवर त्यांनी उघडपणे ताशेरे ओढले होते.
2024 पर्यंत म्हणजे येत्या लोकसभा निवडणुका देखील त्यांच्या कार्यकाळात येणार असल्यामुळे त्यांनी सरन्यायाधीश होऊ नये म्हणुन याचिका टाकल्या गेल्या, अनेक प्रयत्न केल्या गेले.
Collegium पद्धत अयोग्य आहे आणि सरन्यायाधीशांची नेमणूक सरकारने करावी म्हणुन केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरण रिजीजु यांनी तर हल्ली जोरदार प्रचार चालवला आहे.
मात्र या सर्वांना शह देऊन चंद्रचूड आज देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश म्हणुन पदस्थ झालेत. त्यांच्याकडून येत्या काळात अजून अनेक grounbreaking ऐतिहासिक निर्णयांची अपेक्षा आहे!!
#CJI #Chandrachud