बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दणका,अटक होण्याची शक्यता!

बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दणका,अटक होण्याची शक्यता! 

नवी दिल्ली (लोकमराठी) - राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे.त्यामुळे,आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.त्यामुळे,अजित पवार यांना लवकरच अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अत्यंत मनमानी पद्धतीने केलेल्या कर्जवाटपामुळे बँकेला 10 हजार कोटींचा फटका बसला होता.या घोटाळ्याप्रकरणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती.

यानंतर, त्यावर चौकशी समिती नेमली गेली होती.त्याच्या अहवालनंतर कोर्टानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.त्यानंतर,सुप्रीम कोर्टाने दणका देत राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.