रशियामध्ये अण्णा भाऊ साठे यांचे तैलचित्र येत्या १ ऑगस्टच्या अगोदर लावणार : खासदार विनय सहस्त्रबुध्दे

रशियामध्ये अण्णा भाऊ साठे यांचे तैलचित्र येत्या १ ऑगस्टच्या अगोदर लावणार : खासदार विनय सहस्त्रबुध्दे

पुणे : मातंग साहित्य परिनषदेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन फेसबुक लाइव्ह व्याख्यानमालेत आय.सी.सी.आर (भारत सरकार)चे अध्यक्ष व राज्यसभेचे सदस्य खासदार विनयजी सहस्त्रबुध्दे ‘अण्णा भाऊ साठे’या विषयावर त्यांनी दिल्लीहून आपले विचार मांडले.

“लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे कामगार नेते होते. दीनदलितांच्या दुःखांना वाचा फोडणारे वचिंतांचे साहित्यक होते आणि चांगल्या श्रेष्ठ दर्जाचे ते कलावंत देखील होते. त्यांनी सामाजिक जाणिवेने प्रेरित होऊन मुख्यतः महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासात मोलाची कामगिरी केली. अशा थोर व्यक्तींमध्ये अण्णा भाऊंचा समावेश होतो. अण्णा भाऊंचा जन्म एक ऑगस्ट आणि एक ऑगस्ट हीच टिळक यांची पुण्यतिथी असते. जे थोर महापुरुष असतात त्यांची तुलना करणे योग्य नाही, किंवा त्यांच्यातली साम्यस्थळे शोधण्यामध्ये देखील कधी कधी त्यांमध्ये मोठी अडचण असते.पण मला असं वाटतं की लोकमान्य टिळकांच्या सामाजिक विचार वारसा अण्णा भाऊंनी अतिशय प्रामाणिक त्यांनी पुढे चालवला. अण्णा भाऊंची साहित्यसेवा अतिशय मोलाची अशी आहे. त्याचे साहित्य हे सर्व समाजाला कवेत घेणारे आहे.ते केवळ कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध नव्हते.ते सामाजिक नेते होते.

अण्णाभाऊंनी ज्या प्रकारची साहित्यसेवा केली त्याच्यामध्ये केवळ एखाद्या विशिष्ट सामाजिक किंवा भौगोलिक पार्श्वभूमीच्या लोकांचा समाजाचं चित्रण केले आहे असे नाही.तर त्यामध्ये भटक्या-विमुक्तांच्या वेदना आहेत त्यामध्ये हातावर पोट भरणाऱ्यांच्या व्यथा आहेत. कामगारांच्या वेदना आहेत.शहरात राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांच्या वेदना आहेत गरिबांच्या विधनेचा अर्थ आहे.त्यामुळे अण्णा भाऊ साठे ह्यांना महाराष्ट्रातल्या पहिल्या वंचितांच्या साहित्याच्या परंपरेचा प्रारंभबिंदू आहे असे म्हटले तर त्यात काही चुकीचं म्हणतोय असं मला वाटत नाही.

भारतीय प्रथा, परंपरा आणि संस्कृती या सगळ्याचा सन्मान ठेवत ठेवत त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या सुधारणा आवश्यक आहेत, त्यावर खूप मूलगामी अशा प्रकारची मांडणी अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून केली आहे. हे त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे. अण्णा भाऊंना सामाजिक क्रांतीच्या आपण संकल्पनेशी जोडतो आणि ते योग्यच आहे परंतु ही सामाजिक क्रांती घडवून आणत असताना वैचारिक माध्यमातून किंवा आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्यांनी ज्या मूल्यांचा पुरस्कार केला ती सर्व प्रकारे आपल्या परंपरेतून पुढे आलेली मूल्य आणि त्यासाठीचे आधुनिक शब्दावली याचा एक अतिशय सुंदर असा मेळ आपण त्यांच्या साहित्य मध्ये पाहतो. त्यांच्या साहित्यात भारतीय संस्कृतीचे व्यापक चिंतन पाहयाला मिळते.

अण्णा भाऊ साठे थोर साहित्यीक होते पण त्यांच्या कर्तृत्वाच्या मानाने स्वातंत्र्योत्तर काळात विशिष्ट हा जो सन्मान अण्णा भाऊंना मिळायला हवा होता. ज्या प्रकारचा त्यांचा बहुमान व्हायला हवा होता तो एक प्रकारे त्यांना नाकारला गेला. एकूनच त्यांच्या साहित्याच्याबाबतीमध्ये आणि एकूण सामाजिक भूमिकेचे बाबतीमध्ये आणि त्यांना जो सन्मान मिळायला हवा त्याच्या बाबतीत बरीच चर्चा झाली आहेत मला स्वतःलाही अनेक वेळा त्यांच्या संदर्भामध्ये बोलण्याची संधी मिळाली आणि मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात योगायोगाने असं झालं की एक ऑगस्टला त्यांची जन्मशताब्दी असताना त्या दिवशी राज्यसभेच्या माननीय अध्यक्षांनी मला राज्यसभेत त्यांच्यासंदर्भात बोलण्याची परवानगी दिली होती. आणि तिथे राज्यसभे पुढे संसदेच्या साधनांमध्ये मी आग्रही भूमिका मांडली होती. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ केंद्र सरकारने अनेक गोष्टी करण्याची गरज आहे आणि काही मुद्यांचा त्यात उल्लेख केला होता. आज भारतीय संस्कृती संबंध परिषदेची जबाबदारी मी सांभाळत असताना आपल्या समोर ही मांडणी करताना मला खूप आनंद होतो आहे की ज्या रशियामध्ये अण्णा भाऊ साठे गेले होते त्यांनी आपल्या महाराष्ष्ट्राचा झेंडा, भारत देशाची सांस्कृतिक भूमिका साहित्यातून मांडली.

या त्यांचा कामाची नोंद म्हणून व त्यांच्या बद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून भारतीय संस्कृती संबंध परिषदेचे नेहरू सांस्कृतिक केंद्र हे रशियात आहे. रशियातील जवाहरलाल नेहरू (सेंटर फोर इंडियन कल्चर )या केंद्राच्या वास्तूमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे तैलचित्र आम्ही पुढच्या एक ऑगस्टपर्यंत लावू तशा प्रकारचा निर्णय आम्ही केला आहे.” असे मत विनय सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या ऑनलाईन व्याख्यानात मांडले या कार्यक्रमाचे आयोजन मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक/ अध्यक्ष डॉ.धनंजय भिसे यांनी केले होते व्याख्यानमालेचे समन्वयक म्हणून डॉ.अंबादास सगट यांनी काम पाहिले.तर आभार प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर यांनी मांडले. या कार्यक्रमाला ऑनलाइनच्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक,रसिक उपस्थित होते.