खडकी सदार येथील डीपी बॉक्स धोकादायक : महावितणचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष

रिसोड: तालुक्यातील खडकी सदार येथील डीपी बॉक्स अतिशय खराब झाला आहे. गावकऱ्यांने तो बदलून नविन बसवण्याची मागणी महावितरण कार्यालयाकडे वेळोवेळी करुन ही अद्याप तो बदलण्यात आलेला नाही. त्या डीपी बॉक्समुळे जनावराना शॉक लागण्याची शक्यता आहे.

खडकी सदार गावातील शेतात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर डीपी बाक्स असल्याने गावातील जनावरे शेळ्या यांना शाँक लागण्याची शक्यता जास्त प्रणाणात आहे. तसेच डीपी बॉक्स हा मेन लाईन पासून डारेक्ट करण्यात आला आहे. गावात कुठे काही अडचण आली तर लेगच तो बंद करता ही येत नाही. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी गावात जिवीत हानी होण्याच्या आधी डीपी बॉक्स बदण्यात यावा अशी गावकऱ्याची मागणी आहे.