पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या भुमिका साकारणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे लोकांच्या घराघरात व मनामनात पोहोचले. मात्र, डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांची भुमिका केलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून डॉ. कोल्हे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याच अनुशंगाने राष्ट्रवादीने त्यांना निलंबित करावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे यांनी केली असून आघाडी सरकारच्या तिकीटावरती मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. असेही म्हटले आहे.
याबाबत मनोज कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मध्यंतरीच्या काळामध्ये डॉ. अमोल कोल्हेमध्ये अज्ञातवासात गेले आणि थेट नथुराम गोडसे बनत आहे. याचा मागचा मतितार्थ आमच्यासारख्या मतदारांना समजत नाही
गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी आहे. त्याला पडद्यावर रंगवणे म्हणजे त्यांच्या विचाराला मान्यता देण्यासारखं आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रखर भूमिका घेण्याची गरज आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार त्यांची भूमिका २०१७ मधील आहे. पण नथुरामने १९४८ मध्ये गांधीजींची हत्या केली, २०१८ मध्ये नाही. तुम्ही राजकारणात येण्या अगोदरही नथुराम देशद्रोही होता; आणि नंतरही.
डॉ. कोल्हे एका भूमिकेमुळे खासदार झालात हे सर्वांना ठाऊक आहे, नथुराम साकारला पण आपल्याला त्याचे प्रदर्शन थांबवता येईल, पण डॉ. कोल्हे तसे काही करत नाहीयेत. तोकडे स्पष्टीकरण देताय. त्यांच्या वागण्यावरून असं दिसतेय कि राजकारणात त्यांना रस नाही. त्यांच समर्थन केल्याची लाज वाटते.
पोक्षेंमुळे नथुराम विशिष्ट्य समाजाच्या बाहेर झिरपत नाही, म्हटल्यावर कोल्हेंच्या रुपाने तो पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बहूजनांची पोरं या कारस्थानाला बळी पडतात. जरा कमी शिकलेल्यांचं जाऊ द्या हो. कोल्हे तर डॅाक्टर आहेत नं? मग बिना अभ्यास करताच रोल स्विकारता का?
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि थेट नथुराम? वर कुठलाच पश्चात नाही!
गांधी हे नाव नाही तर विचार आहे आणि जे जे सच्चे भारतीय या विचारला जागतात, ते सगळेच गांधी आहेत. अहिंसा, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समानता या मूल्यांचा ज्या लोकांशी दूरान्वये ही संबंध नाही. त्या नथुरामाच्या भक्त व चेले चपाट्यांनी गांधी म्हणजे काय ते शिकवू नये.
गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी आहे त्याला पडद्यावर रंगवणे म्हणजे त्यांच्या विचाराला मान्यता देण्या सारखं आहे. नथुराम साकारत असताना त्याचे काय परिणाम होऊ शकतात. याचा डॉ अमोल कोल्हे यांना अंदाज नसेल असे नाही.
याचा अर्थ ही कृती त्यांनी विचारपूर्वक केलेली आहे. आता प्रश्न राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा म्हणजेच शरद पवार यांचा आहे. ते डॉ. कोल्हे यांच्याबाबत काय भूमिका घेणार?
डॉ. अमोल कोल्हे यांना आमचं जाहीर आवाहन आहे की, आपण महात्मा गांधी निपक्षपणे राष्ट्रपिता म्हणत असाल तर नथुराम गोडसेच्या भूमिकेत जाण्यापूर्वी पुन्हा पुन्हा विचार करायला हवा होता. त्यातून काय साध्य होणार आहे, याचा विचार आपण करायला हवा होता.
डॉ. कोल्हे आता आमच्या शहराचे खासदार झाला आहात, आमचे लोकप्रतिनिधी आहात. त्यांचे आम्ही प्रचारक व मतदार आहोत. ते जसे अभिनेता हा तसेच जबाबदार नेते सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांची सार्वजनिक जीवनातील जबाबदारी वैचारिक भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका सुंदर अप्रतिमरित्या पार पाडली. घराघरात महाराजांचा वास्तव खरा इतिहास आपण मालिकेच्या पाणी पोहोचवला. अनाजी पंत व ती प्रवृत्ती तमाम जनतेला कळली त्याबद्दल आम्ही तुमचे नेहमीच कौतुक केले. पण नथुराम गोडसे यांच्या चित्रपटाविषयी त्यांनी भूमिका स्वीकारताना नीट अभ्यास करत सकल माहिती घेतली असेल.
निर्मात्याशी झालेल्या करारानुसार ते सदर चित्रपट प्रदर्शित होण्यापासून थांबवू शकत नसतील. पण, आम्ही सर्व गांधी प्रेमी त्या चित्रपटासाठी विरोधात हे नक्की करणार? गांधी ही व्यक्ती नव्हे, एक विचार आहे. जो विचार जगाने आदर्श समजला.
कोल्हे कलाकार म्हणून जर केलेला भूमिकेचे अभिव्यक्ती च्या नावाखाली समर्थन करत असतील. तरीपण एक राजकीय नेते म्हणून व आमचे लोकप्रतिनिधी खासदार म्हणून आपण महात्मा गांधीना राष्ट्रपिता मानता की नाही, याचे जगजाहीर स्पष्टीकरण द्यावेच लागेल.
त्यांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी. ते गांधी विचारांवर खासदार झाला आहात. आता गोडसेंच्या विचारावर तुम्ही खासदार होतात का, हेच आम्हाला बघायचे आहे.