Tag: Dr Amol Kolhe

आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे 
पुणे

आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना बैलगाडा शर्यतीच्या लढ्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा नारायणगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने आज बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली हा आनंदाचा आहे, म्हटलं तर समाधानाचा, अगदी दसरा - दिवाळीच्या सणासारखा दिवस आहे. त्यामुळे 'याचसाठी केला होता अट्टाहास' अशी भावना सर्वांच्या मनात आहे, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी आपल्या भावना व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच हे संपूर्ण यश तमाम बैलगाडा मालक, शौकिनांचे असल्याचे त्यांनी सांगितले. https://youtu.be/r_HajS04WlI बैलगाडा शर्यतींवर लवकरच आपण चित्रपट बनवणार असल्याचे सांगून त्याची तयारी आधीपासूनच सुरू झाली असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. बैलगाडा मालकांचे कष्ट, त्यांचं बैलांशी असलेलं नातं या सगळ्याचा उहापोह यात असेल त्याचबरोबर एक ...
डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने निलंबित करावे – मनोज कांबळे
पिंपरी चिंचवड

डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीने निलंबित करावे – मनोज कांबळे

पिंपरी : छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या भुमिका साकारणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे लोकांच्या घराघरात व मनामनात पोहोचले. मात्र, डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांची भुमिका केलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून डॉ. कोल्हे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याच अनुशंगाने राष्ट्रवादीने त्यांना निलंबित करावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे यांनी केली असून आघाडी सरकारच्या तिकीटावरती मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. असेही म्हटले आहे. याबाबत मनोज कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मध्यंतरीच्या काळामध्ये डॉ. अमोल कोल्हेमध्ये अज्ञातवासात गेले आणि थेट नथुराम गोडसे बनत आहे. याचा मागचा मतितार्थ आमच्यासारख्या मतदारांना समजत नाही गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला...
तोपर्यंत फेटा बांधणार नाही; राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार
राजकारण

तोपर्यंत फेटा बांधणार नाही; राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार

बीड, ता. २५ (लोकमराठी) : बीड जिल्ह्यातील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार निवडून येत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरु असून या यात्रेनिमित्त आंबेजोगाई येथे आयोजित सभेत खासदार कोल्हे यांनी होते. शिवस्वराज्य यात्रा परळीहून अंबाजोगाईला आली असता, परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत निवडून येणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही. तसेच जेव्हा आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन, असे विधान खासदार अमोल कोल्हे यांनी आयोजित सभेत केले. राष्ट्रवादीच्या आमदार नमिता मुंदडा यांनी फेटा बांधण्यास घेतला असता त्यास नकार देत कोल्हे यांनी वरील निर्धार व्यक्त केला. दरम्यान...