रहाटणीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटाची स्थापना

रहाटणीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटाची स्थापना

रहाटणी : येथील महाराष्ट्र कॉलनी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गटाची नुकतीच स्थापना करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते देविदास आप्पा तांबे यांच्या हस्ते या बचत गटाचे उद्घाटन करण्यात आले.

त्यावेळी महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगिता प्रकाश कांबळे, उपाध्यक्षा अरूणा हितेंद्र कांबळे, खजिनदार अनिता विभिषण लोंढे, सदस्य रंजना भगवान कांबळे, सुरेखा दादासाहेब कांबळे, माधुरी धनाजी कांबळे, लिला सचिन कांबळे, ललिता अशोक जानराव, सुनिता सिद्धार्थ लगड, पार्वती नेताजी कांबळे, गितांजली रघुनाथ कांबळे, वनिता निलकंठ रामपूरे आदी उपस्थित होते.

अध्यक्षा संगिता कांबळे म्हणाल्या की, महिलांना घरी बसल्या कामे मिळावेत व महिला स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात. या उद्देशाने या महिला बचत गटाची स्थापना केली आहे. बचत गटाच्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा महिलांना लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.