पिंपरी : शरीरातील डोळे हा अवयव सुदृढ आणि निरोगी रहावा यासाठी माधव धनवे पाटील यांनी प्रभाग १७ मधील नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेविका शमीम पठाण यांच्या हस्ते झाले.
या शिबिरासाठी १६० जणांनी नाव नोंदणी केली होती. त्यात ८० जणांचे नेत्र तपासणी करण्यात आली. यासाठी हडपसर येथील प्रसिद्ध एच.वी. देसाई आय हॉस्पिटलने सहकार्य केले. या शिबिरास दळवीनगर य, भोईरनगर, उद्योगनगर, इंदिरानगर, बिजलीनगर आणि प्रेमलोक पार्क भागातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत याचा लाभ घेतला.
यावेळी माधव पाटील म्हणाले की, समाजातील सर्व घटकांपर्यंत आरोग्याच्या सुखसुविधा पोहोचल्या पाहिजेत. यासाठी या शिबिराचे आयोजन केले होते. यापुढे दंत चिकित्सा शिबिर, कॅन्सर तपासणी, रक्त तपासणी तसेच इतर आरोग्य विषयक शिबिरे घेण्याचा मानस माधव पाटील यांनी व्यक्त केला.
त्यावेळी ज्ञानेश्वर कांबळे, संपत पाचुंदकर, बजबळकर, विशाल काळभोर, सचिन सकोरे, संतोष कुंभार, अधिकराव जाधव, पल्लवी पांढरे, संगीता कोकणे, ज्योती निंबाळकर, आशा मराठे आदी उपस्थित होते.