पिंपरी : आप पिंपरी चिंचवड च्या कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या उपस्थिती मध्ये आज पक्ष कार्यालय मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
साई हॉस्पिटल चे संचालक डॉ. प्रशांत देशमुख यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले.
आप कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे, शहराध्यक्ष अनुप शर्मा, कामगाररत्न प्रकाश परदेशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सूत्रसंचालन राज चाकणे यांनी केले.
या प्रसंगी महालक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी दत्ता बागुल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, ओम फिनिक्स क्लासेस संचालक प्रा. पांडुरंग फुंदे, बसपा चे पदाधिकारी महेश गायकवाड, युवा कार्यकर्ते विवेक नामदेव भोरे, प्राध्यापक पांडुरंग फुंदे यांनी आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
त्याच बरोबर खालील नवीन कार्यकर्त्यांच्या पदनियुक्त्या करण्यात आल्या.
मंगेश अनंत आंबेकर – भोसरी विधानसभा उपाध्यक्ष
श्री. मोतीराम अगरवाल – कासारवाडी प्रभाग प्रमुख
सरोज कदम – यमुनानगर प्रभाग प्रमुख
ब्रह्मानंद जाधव – मोरवाडी-चिंचवड स्टेशन प्रभाग प्रमुख
डॉ. रामेश्वर मुंडे – पिंपरी चिंचवड शहर डॉक्टर आघाडी उपाध्यक्ष
निखिल बालीघाटे – चिंचवड विधानसभा युवा आघाडी उपाध्यक्ष
सुरज बालपांडे – चिखली प्रभाग प्रमुख
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड शहरातील आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.