पिंपरी : राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षेमध्ये गौतमी निकम ही विद्यार्थिनी भारतामध्ये प्रथम आली. त्यामुळे गौतमी हिला स्व. माजी सरपंच गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते लॅपटॉप भेट देण्यात आला.
त्याप्रसंगी प्रभाग क्रमांक २७ च्या नगरसेवका व महापालिका महिला बालकल्याण सभापती सविता खुळे, चिंचवडचे प्रभारी संतोष कलाटे, नवीन लायगुडे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते, स्वीकृत सदस्य गोपाल माळेकर, स्वराज पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील कुंजीर, ट्रस्टचे अध्यक्ष देविदास आप्पा तांबे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९३६ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा यांच्या वतीने २०१९ मध्ये ही परिक्षा घेण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते.