केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची अपना वतनची मागणी

  • जेएनयू मधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ थेरगाव मध्ये ” कँडल मार्च ”
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची अपना वतनची मागणी

पिंपरी : दिल्ली येथे जेएनयू मधील विद्यार्थ्यांवरील रविवारी रात्री झालेल्या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ अपना वतन संघटनेच्या वतीने मंगळवार (दि. ७) संध्याकाळी थेरगाव येथील धनगर बाबा मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा कँडल मार्च काढण्यात आला.

यावेळी मधील विद्यार्थ्यांवरील हल्लयाच्या निषेधार्थ हिटलर शाही मुर्दाबाद, तानशाही मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद, अमित शहा राजीनामा द्या अशा घोषणा देण्यात आल्या. यामध्ये थेरगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले की, “विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, परंतु या विद्यार्थ्यांवर हल्ला करून हल्लेखोरांनी अतिशय निदनीय कृती केली आहे. विद्यार्थ्यांवर भारताच्या राजधानीमध्ये घोळक्याने काही गुंड घुसतात व विद्यर्थिनी, विद्यर्थी शिक्षकांना मारहाण केली. रस्त्यावरील लाईट बंद होते तसेच सुरक्षयंत्रनेला याबाबत काही खबर असते. हे षडयंत्र रचुन केलेलं कारस्थान असून याला जबाबदार केंद्रीय गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.”

यावेळेस अपना वतन संघटनेच्या शहराध्यक्षा राजश्री शिरवळकर, कार्याध्यक्ष हमीद शेख, चिंचवड विभागप्रमुख फारुख शेख, संगीत शहा, फातिमा अन्सारी, साकी गायकवाड, सुनील ढसाळ, अनिता साळवे, अनिता रायडू, तौफिक पठाण, हाजीमलंग शेख, फ्रान्सिस गजभिव, राजन नायर, डेव्हिड काळे, स्वप्नील कसबे, सुरेश गायकवाड, विशाल निर्मल, दिवेश पिंगळे, गालिब अरब, हमीद मणियार, आवद चाऊस, जमील शेख, अलीम शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Actions

Selected media actions