राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे अरुण बोराडे यांचा सन्मान

राष्ट्रवादी अर्बन सेलतर्फे अरुण बोराडे यांचा सन्मान

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

पिंपरी, ता. १६ : खराळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालय येथे अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने पक्षाचे मुख्य संघटक, कामगार नेते, साहित्यिक, गिर्यारोहक, विविध विषयांचे गाडे अभ्यासक असे अष्टपैलु नेतृत्व असलेल्या अरुण बोराडे यांचा शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला शहराध्यक्षा कविता अल्हाट व राष्ट्रवादी अर्बन सेल अध्यक्षा मनीषा गटकळ यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. गोरक्ष लोखंडे प्रस्तावना मांडली. पक्ष प्रवक्ते, विनायक रणसुंभे, संपत पाचुंदकर, ओबीसीचे शहराध्यक्ष विजय लोखंडे आणि इतर मान्यवरांनी अमृत मोहोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा देताना, अरुण बोराडे यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. शेवटी माधव पाटील यानी आभार व्यक्त केले.