स्वातंत्र्यदिनानिमित्त जयविजय मित्र मंडळातर्फे वेताळ टेकडीवर वृक्षारोपण

स्वातंत्र्यदिनानिमित्त जयविजय मित्र मंडळातर्फे वेताळ टेकडीवर वृक्षारोपण

दापोडी : ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दापोडी येथील जयविजय मित्र मंडळाच्या वतीने वेताळ टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणात जांभूळ, पेरू, सिताफळ, चिंच, कडुनिंब आणि इतर प्रकारची अशी २५ झाडे योग्य पद्धतीने आणि पाण्याच्या सोयीनुसार रोपण करण्यात आली.

यावेळी मंडळाचे अधक्ष्य बाळासाहेब मोरे, कार्याध्यक्ष प्रविण कांबळे, सचिव प्रणव रोकडे, उपाध्यक्ष ऋतिक कांबळे, खजिनदार श्रवण पिल्ले, सांस्कृतिक प्रमुख तुषार पिल्ले, यश कांबळे, माजी अध्यक्ष विशाल लगड, युवा सभासद अक्षय मोरे, शुभम मित्तल, सुंदर जाधव, नील लगड, ज्येष्ठ सल्लागार मधुकर गायकवाड, सुनील ब्राम्हणे, जितेंद्र गायकवाड, माजी अध्यक्ष आनेश रोकडे, रमेश ओव्हाळ, मनोज खळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.